पाहिलत? ……. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (वय सुमारे 80 पार) काय म्हणतात? त्यांची जीभ घसरली म्हणे. लोक डॉक्टर्सना देव मानतात. मात्र संभाजी भिडे बाबा त्यांना “लुटारु, हरामखोर, आपटून मारायच्या लायकीचे” असली विशेषणे वापरुन व्हिलन ठरवू पाहतात. त्यासाठी ते कोरोना काळात डॉक्टर्सनी केलेल्या लुटालुटीचा संदर्भ देतात. डॉक्टर्स या प्रतिष्ठीत वैद्यकीय सेवा क्षेत्रातील या मान्यवरांना धक्कादायक विशेषणांनी बुकलून काढतांना भिडे बाबांनी कोरोना काळातल्या काही हॉस्पीटल्सच्या बिलांचा अप्रत्यक्ष उल्लेख केलेला दिसतो. हे भिडे बाबा जे काही बोलले त्याचा मेडीकल क्षेत्र विरोध – निषेध करु शकते. परंतु महाराष्ट्रातल्या अनेक शहरातल्या जनसामान्यांच्या मनातली भडास भिडे बाबांनी बाहेर काढली असे वाटू शकते. भिडे बाबा हे जे बोलताहेत तेच लक्षावधी लोकांच्या मनातही खदखदते आहे बर आ? पण लोक जाहीरपणे असभ्य शिवीगाळ करु इच्छीत नाही. कुणी तरी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली तर त्यांना हवच असते!
आता हे भिडे बाबा डॉक्टर्सबद्दल जरा अतीच बोलले असही काहींना वाटू शकते. सेवा क्षेत्राचा जेव्हा बिझीनेस होतो तेव्हा असे घडते. जेव्हा डोक्यावरुन पाणी जाते तेव्हा भावनेचा बांध फुटतो. भिडे बाबा म्हणतात त्याप्रमाणे कोण कोणत्या शहरात “आपटून मारण्याच्या” लायकीचे कोण कोण आहेत किंवा असावे याचा आता लोकांनीच शोध घ्यायला हरकत नसावी. त्याच्याच जोडीला “वंदनीय” डॉक्टर्स आहेत काय? याचाही शोध घेतल्यास उत्तमच.
भिडेबाबांनी वैद्यकीय सेवा क्षेत्रातल्या कथित बदमाशीच्या काळ्या बाजूवर प्रहार करत संताप व्यक्त केला. आता भिडेबाबा म्हणतात म्हणून नव्हे तर ताज्या युक्रेन – रशिया युद्धामुळे देखील हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमधे वैद्यकीय शिक्षणासाठी का जातात? हा नवा प्रश्न समोर आला आहे. भारतात उच्च प्रतिच्या वैद्यकीय शिक्षणाची सोय नाही का? असला प्रश्न विचारु नये. मेडीकल सायन्स क्षेत्रात जाऊ इच्छिणा-यांना ”नीट” ची कठीण परिक्षा द्यावी लागते. सुमारे 14 ते 16 लाख विद्यार्थी ही परिक्षा दरवर्षी देतात. त्यापैकी 50 टक्के म्हणजे 7 ते 8 लाख उत्तीर्ण होतात. त्यापैकी फक्त 1 लाख 15 हजार विद्यार्थ्यांना मेडीकल प्रवेश मिळतो. त्यासाठी मेडीकल कॉलेजेस चालवणा-या शिक्षण संस्थांमधील उपलब्ध असलेल्या सुमारे 1लाख 20 हजारावर जागा, शिक्षणसंस्थांचा मॅनेजमेंट कोटा, सुमारे 1 ते 3 कोटीपर्यंतची आकारली जाणारी डोनेशन्स, हवे ते कॉलेज न मिळणे अशा कारणामुळे लक्षावधी विद्यार्थी काही एजंटस् द्वारा विदेशाचा रस्ता धरतात. युक्रेन मधे वैद्यकीय शिक्षणाची कथित पदवी मिळवली तरी त्या पदवीधारकाला भारतात मेडीकल प्रॅक्टीसची परवानगी नसल्याचे सांगितले जाते. फक्त आमच्या मेडीकल कॉलेजला या, अॅडमिशन घ्या, डॉक्टर्स म्हणून पदवी घ्या, नंतर पुढे काहिही करा. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात झोपडपट्टी किंवा दुर्गम भागात जमेल तेथे काही डॉक्टर्स दवाखाने थाटून बसले आहेत. काही झोलाछाप डॉक्टर्स म्हटले जातात. तर काही बोगस डॉक्टर्स असल्याचे बाहेर आले आहे. कोरोना काळात वसई भागात तर दक्षिण महाराष्ट्रात बोगस नावे धारण करुन काही डॉक्टर्सनी जोरात बिझनेस केल्याचे सांगितले जाते.
सुमारे 35 ते 40 वर्षापुर्वी मुंबईत कंपाऊंडर म्हणून वैद्यकीय क्षेत्रात काम करणा-याने दक्षिण महाराष्ट्रात सातारा – वाई भागात डॉक्टर बनून “देवमाणूस” म्हणून कसे दहा – बारा महिलांचे – पुरुषांचे खून पाडले त्याची चॅनलवाल्यांनी बनवलेली स्टोरी मध्यंतरी गाजली. आणखी आठवण द्यायची तर सुमारे तिस वर्षापुर्वी “इलेक्ट्रोपॅथी” मेडीकल डिग्री देणा-या कॉलेजेसचे प्रकरण पुणे ते अमरावती पर्यंत गाजले. या महाभागांनी तर म्हणे डॉक्टर्स पदव्यांचा बाजारच भरवला होता. त्या डॉक्टर्स पदवीधारकांनाही मेडीकल प्रॅक्टीस परवानगी दिली गेली नाही. काही जणांनी अशी पदवी घेऊन प्रतिष्ठा मिळवली. कदाचीत लग्नाच्या बाजारात भाग्य अजमावले असेल. बरीच कोर्टबाजी झाली. या अभ्यासक्रमाचे संयोजक, कॉलेजेस निर्माण करणारे, त्यासाठी विद्यापीठही काढणारे दुकान बंद करुन वेगळ्या वाटेने पुढे गेले. कोर्टात निर्दोष सुटले. हा अध्याय असा संपला.
महाराष्ट्रात आणि देशात एमबीबीएस सह उच्च पदवी मिळवायची तर मेडीकल अॅडमिशनसाठी एक तर मेरीट हवे, मग अॅडमिशनसाठी देणग्यांचा 3 कोटीपर्यंतचा पल्ला, दरवर्षी सुमारे 1 कोटीचा खर्च, तो ही करुन झाल्यावर हॉस्पीटल उभारणीचा खर्च किमान पाच – दहा कोटी ठरलेला. काही हॉस्पीटल्ससाठी किमान 50 ते 100 कोटीचाही खर्च आजच्या काळात काही मॅनेजमेंटस् करतात. त्यामुळे एकदा केलेल्या या प्रचंड गुंतवणूकीची व्याजासह वसुली अधिक नफा अशा हिशेबाने मंडळी कामास लागते. या खर्चाची भरपाई म्हणून औषध विक्री व्यवसायात उतरावे लागते. रुग्णाच्या आवश्यक तपासण्यांनी भागत नाही म्हणून की काय गरज नसलेल्या अनावश्यक तपासण्या केल्या जातात. यावर लंडन स्थित भारतीय देशप्रेमी डॉ. संग्राम पाटील यांनी प्रकाशझोत टाकला आहे. मेडीकल क्षेत्रात “मुन्नाभाई” बनून एमबीबीएस पदवी कशी मिळवली जाते ते देखील जनतेसमोर आहे. केवळ मेडीकलच नव्हे तर इंजीनिअरिंगसह ज्ञानाचे हे भांडार विद्यार्थ्यांसाठी ज्या शिक्षणसंस्थां खुल्या करतात त्यांच्या “श्रेणी” मिळवण्यापासून हा व्यापार सुरु होतो असे म्हणतात. शिक्षण संस्था – त्यांची महाविद्यालये “नॅक” अशा उच्च वर्गाची श्रेणी मिळवतात. नंतर शैक्षणीक शुल्क ठरवण्याचा अधिकार वापरला जातो. यासाठी साचेबद्ध कार्यपद्धती असली तरी शैक्षणिक पदवीका अभ्यासक्रमाची फी किंवा खर्च अत्यंत कमी आकारण्याचा लढा विद्यार्थी किंवा पालक जिंकू शकले नाहीत. त्यामुळे ज्ञानाच्या क्षेत्रातील ही एकाधिकारशाही स्वरुपाची मक्तेदारी कशी मोडून काढणार? हा प्रश्न उरतोच. भिडे बाबांसारखे सामाजिक कार्यकर्ते खंत आणि संताप व्यक्त करतात. त्यांचा हा संताप भावनिक उद्रेक तेवढा समजायला हरकत नसावी. सर्वसामान्यांच्या मनात साठलेल्या भावनांची ही अभिव्यक्ती फार तर म्हणता येईल. मनोभावना, शब्द, शिव्या, अभिव्यक्ती आणि अर्थबोध या दृष्टीने सकल विषय हाताळला जावा ही सद्भावना