दोघा मुलींसह विवाहितेची आत्महत्या

जळगाव : चोपडा  तालुक्यातील बिडगाव  येथे विवाहितेने आपल्या दोघा चिमुकल्यांसह  विहिरीत उडी घेत आमहत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.  या घटनेमुळे चोपडा तालुक्यात शोककळा पसरली आहे. तिघांचे  शव बाहेर काढल्यानंतर ते उत्तरीय तपासणीकामी उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. वर्षा विनोद बाविस्कर (35), मोनाली विनोद बाविस्कर व किर्ती विनोद बाविस्कर अशी तिघा मयतांची नावे आहेत.

या घटनेतील मयत वर्षा बाविस्कर या विवाहितेचा पती विनोद याचे 2 मार्च रोजी त्याच्या  आईवडीलांसमवेत आर्थिक कारणावरुन वाद झाल्याचे समजते. या वादातून त्याने विषारी औषध प्राशन करत जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल  करण्यात आले. या घटनेचा धसका घेत वर्षा बाविस्कर या विवाहितेने आपल्या दोघा चिमुकल्या मुलींसह विहीरीत उडी घेतली. यात तिघांचे प्राण गेले. मोठी मुलगी खुशी ही नातेवाईकांकडे असल्यामुळे बचावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here