औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावर मुंबई येथून आलेल्या विमानाला सुमारे पंधरा मिनीटे हवेतच घिरट्या घालण्याची वेळ आली. 3 मार्च रोजी खोकड हा प्राणी विमानाच्या धावपट्टीवर संचार करत असल्याचे वैमानिकाला आढळून आला.
जोपर्यंत या प्राण्याने तेथून निर्गमन केले नाही तोपर्यंत विमानाला हवेतच घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नव्हता. साधारण तिन घिरट्या घालत पंधरा मिनीटांचा कालावधी झाल्यानंतर धावपट्टीवरील प्राण्याने तेथून प्रस्थान केले. त्यानंतर विमानाचे सुरक्षीत लॅंडींग करण्यात आले. विमान लॅंड झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.