औरंगाबाद : अजिंठा लेणीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन कॉपर व ऑईल असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल पळवून नेणा-या तिघा आरोपींना औरंगाबाद एलसीबी पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. शेख शाहरुख शेख नजीर, अजिम सादिक खॉ, शेख मुजीब शेख नूर (तिघे रा. वालसांगवी) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.
24 फेब्रुवारी रोजी सदर घटना घडली होती. याप्रकरणी अंबादास राऊत यांनी फर्दापूर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीच्या आधारे फिर्याद दाखल करण्यात आली होती. पोलिस अधीक्षक निमित गोयल, अपर पोलिस डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले बोलेरो वाहन हस्तगत करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.