चाकू हल्ल्यासह मोबाईल लांबवणा-यास अटक

जळगाव :  मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर चाकू हल्ला करुन त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून मोटारसायकलने पलायन करणा-या दोघांपैकी एकाला एलसीबी पथकाने अटक केली आहे.  यातील फरार असलेला एक आरोपी अल्पवयीन बालक आहे. 14 फेब्रुवारी 2022 रोजी जळगाव  शहरातील  मानराज पार्क नजीक नवजीवन सुपर शॉपी परिसरात सदर घटना घडली होती. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा  दाखल  करण्यात आला होता.

मोबाईलवर बोलत असतांना तो हिसकावून नेण्याचे प्रकार पुन्हा वाढत असल्याचे बघून या घटनेप्रकरणी स्वत: पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी भेट दिल्यानंतर तपासाच्या  सुचना दिल्या होत्या. या गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी पथकाची निर्मीती केली होती. या पथकात हे,कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, संदिप सावळे, पो.नाईक नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहुल पाटील, अविनाश देवरे आदींची नेमणूक केली होती.

अहोरात्र परिश्रम घेत तपास पथकाने गुन्हेगारांचा  माग काढण्याचे काम सुरु केले. दरम्यान रणजीत उर्फ बबलू हिरालाल जोहरे व त्याचा अल्पवयीन  साथीदार यांनीच हा गुन्हा केल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे पथकाने माग काढत असतांना पथकाला समजले की हे दोघे आरोपी शिवाजी नगर भागात वास्तव्याला आहेत. त्यानुसार पथकाने शिवाजी नगर भागात फिरुन माहितीचे संकलन केले. सोबत खब-यांची देखील मदत घेतली. शोध सुरु असतांना समजले की आरोपी एमएच 19 डिजे 5017 या क्रमांकाच्या अ‍ॅक्टीव्हा दुध फेडरेशन परिसरात संचार करत आहेत. अखेर त्याला ताब्यात घेण्यात पथकाला यश आले. त्याची विचारपुस केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकल व चाकूसह आरोपीस अटक करण्यात आली. त्यांच्याकडून फिर्यादीकडून हिसकावलेला मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला. पुढील तपासकामी आरोपी रणजीत जोहरे यास जिल्हापेठ  पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here