शिक्षकाचा  विधवा शिक्षिकेवर अत्याचार

सोलापूर : पाच वर्षांच्या बालिकेचे अपहरण करुन तिला ठार करण्याची धमकी देत विधवा शिक्षिकेवर अत्याचार करणा-या शिक्षकाविरोधात बार्शी शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी लक्ष्मण जाधव (रा. वाणी प्लॉट, आगळगाव रोड, बार्शी) असे पिडीत विधवा शिक्षीकेने गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपी शिक्षकाचे नाव आहे. संशयीत शिक्षक विकी जाधव यास पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित शिक्षीकेच्या पतीचे सन 2020 मधे निधन झाले होते. पिडीतेची तेथील शिक्षक विकी जाधवसोबत ओळख झाली होती. तिच्या सर्व अडचणींची विकीला माहिती होती. त्याचा त्याने गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. त्याच्या त्रासाला वैतागून ती सन 2021 मधे माहेरी आईसोबत राहण्यास निघून आली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मधे पीडित शिक्षीका बार्शी शहरात दुसरीकडे भाड्याच्या खोलीत आपल्या मुलीसह राहू लागली. तु माझ्यासोबतच रहा नाहीतर तुझी बदनामी करेन व तुला जगू देणार नाही असे म्हणत त्याने तिच्यावर अत्याचार केला. तिच्या पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करत तिला दमदाटी तसेच मारहाण व अत्याचार केल्याप्रकरणी विकी जाधव याच्याविरोधात बार्शी शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सारिका गटकुळ करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here