दोन गावठी कट्ट्यासह डॉलर अटकेत

On: March 17, 2022 5:20 PM

जळगाव : जळगाव शहरातील मासुमवाडी परिसरातून दोन गावठी कट्ट्यासह एकास अटक करण्यात आली आहे. खलील अली उर्फ डॉलर शाहरुख शकील अली (29) रा. बिल्डींग नं. 20, रुम नं. 20 गेंदालाल मिल जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या कब्जातून अनुक्रमे 15 व 10 हजार रुपये किमतीचे दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. याप्र्कारणी पो.कॉ. चंद्रकांत बळीराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो. ना. सुधीर सावळे, पो.ना. हेमंत कळसकर, पो.कॉ. चंद्रकांत बळीराम यांना याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली आहे. अटकेतील आरोपी खलील अली उर्फ डॉलर यास आज न्या. ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याल 19 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सुरळकर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. हेमंत कळसकर, पो.ना. सुधीर सावळे, पो.ना. इम्रान सैय्द, पो.ना. सचिन पाटील, पो.ना. मुदस्सर काझी, पो.कॉ. साईनाथ मुंढे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तसेच त्यांचे सहकारी सचिन पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment