मद्यपी पत्नीची पतीने केली हत्या

On: March 19, 2022 9:56 AM

जळगाव : पत्नीने मद्यपान केल्याचा राग आल्याने पतीने तिच्या डोक्यात कु-हाड घालून तिला जीवे ठार केल्याची घटना मेहुणबारे येथे आज उघडकीस आली आहे. मेहुणबारे पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. कुवरसिंग चत्तरसिंग पावरा (मोहरतमाळ मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. निनुबाई असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

आरोपी पती त्याच्या मद्यपी पत्नीसह शेतमजुरी करत होते. एका शेडमधे दोघांचे वास्तव्य होते. पत्नीने मद्यपान केल्याचा आरोपीला राग आला. त्याने तिला याबाबत जाब विचारला असता दोघात वाद झाला. दरम्यान त्याने संतापात तिला बेदम मारहाण केली. मारहाणीत तिचा मृत्यू झाला. वाद वाढत गेल्याने कुवरसिंग याने पत्नी निनुबाईच्या डोक्यात जवळच पडलेली कु-हाड हाणली. त्यात ती मृत्युमुखी पडली. स.पो.नि.विष्णु आव्हाड व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment