जळगाव : महाराष्ट्र कृषी विभागाच्या “राज्य कृषी यांत्रीकीकरण” योजनेच्या अंतर्गत सबसिडीची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा केल्याच्या बदल्यात पंधराशे रुपयांची लाच मागणा-या आणि स्विकारणा-या कृषी सहाय्यकास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ललितकुमार विठ्ठल देवरे असे पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यकाचे नाव आहे. सदर लाचेची रक्कम देवरे लाचखोरे याने पाचोरा येथील कृषी अधिकारी कार्यालयात स्विकारली.
तक्रारदाराच्या आईने महाराष्ट्र कृषी विभागाची “राज्य कृषी यांत्रिकीकरण” योजने अंतर्गत शेती कामासाठी लागणारे बीसीएस पॉवर ट्रिलर हे मशीन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. सदरचा अर्ज हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मंजुर झाला होता. त्यानंतर बीसीएस पॉवर ट्रिलर हे मशीन लाभार्थी असलेल्या तक्रारदाराच्या आईने खरेदी केले. सदर योजने अंतर्गत मिळणारी 85,000/- रुपये सबसिडीची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा झाली. सदर सबसिडीची रक्कम बॅंक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात लाभार्थी अर्जदाराच्या मुलाकडे (तक्रारदाराकडे) कृषी सहायक ललितकुमार देवरे यांनी पंधराशे रुपयांच्या लाचेची मागणी केली. सदर लाचेची मागणी सिद्ध झाली. त्यानंतर एसीबी पथकाकडून सापळा रचण्यात आला. या सापळ्यात लाचेची रक्कम स्विकारतांना लाचखोर कृषी सहाय्यक अडकला.
जळगाव एसीबीचे पर्यवेक्षण अधिकारी तथा डीवायएसपी शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.र्को.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पी.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.