जळगाव : जळगाव पोलिस दलातील पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत भगवान पाटील तसेच सहायक फौजदार भिकन गोविंदा सोनार यांना गेल्या 21 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते “राष्ट्रपती पोलीस पदक” प्रदान करण्यात आले. याबद्दल जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उप अधिक्षक (गृह) विठ्ठल ससे आदींनी त्यांचे कौतुक करुन सन्मान केला.
पोलिस उप – निरीक्षक चंद्रकांत भगवान पाटील हे 8 जून 1988 रोजी जळगाव पोलिस दलात रुजू झाले आहेत. त्यांच्या सेवा कालावधीत त्यांनी अतिशय उत्कृष्ठ कामगीरी केली आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असतांना त्यांना 26 जानेवारी 2020 रोजी सदर पदक घोषित झाले होते. ते पदक त्यांना 21 मार्च 2022 रोजी राज्यपालांच्या हस्ते सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आले आहे. यापुर्वी त्यांना 1 मे 2006 रोजी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (पदक) देखील बहाल करण्यात आले आहे.