विषारी दारुमुळे 21 जणांचा मृत्यू

पंजाब दारुबळी : तेरा अधिकारी निलंबित

चंदीगड : पंजाबच्या अमृतसर, बटाला आणि तरनतारन याठिकाणी विषारी दारु प्राशन केल्यामुळे आतापर्यंत 21 जण मृत्यूमुखी पडले आहेत. पोलिसांनी मद्यनिर्मीती करणा-या काही लोकांना ताब्यात घेतले आहे. तरसिक्क पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिका-यास निलंबीत करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपासासाठी एसआयटीची निर्मिती करण्यात आली आहे.

विषारी दारुमुळे 29 जून रोजी अमृतसर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत मुच्छल व तंग्रा या ठिकाणी प्रथमच पाच जण मृत्यूमुखी पडले. त्यानंतर 30 जुलैच्या सायंकाळी मुच्छलमध्ये आणखी दोघे जण मरण पावले.

हे हि वाचा लॉकडाऊन काळात प्राशन केले सॅनीटायझर आतापर्यंत ९ जणांचा ओढवला मृत्यू

दोन जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला, तर एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. यानंतर मुच्छल गावात अजून दोघांचा तर बटाला शहरात देखील दोघांचा मृत्यू झाला. बटाला या गावी एकुण सात जणांचा मृत्यू ओढवला आहे. तरणतारणमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याचा तपास जालंधरच्या विभागीय आयुक्तांकडे सोपवला आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here