जळगाव : जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलींचे बालगृह / निरीक्षण जळगाव येथे दाखल असलेल्या व सापडलेल्या तिघा बालिकांच्या पालकांची अद्याप ओळख पटलेली नाही. या तिन्ही बालिका सापडल्यापासून अद्यापपर्यंत त्यांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी वा त्यांना भेटण्यासाठी आलेले नाहीत. त्यांच्याविषयी कुठलाही पुरावा देखील उपलब्ध झालेला नाही.
रोहिनी करण उईके/बारेला ही बालिका 23 ऑगस्ट 2016 पासून सापडली असून आजमितीला तिचे वय 15 वर्ष आहे. सोनी मनोहर गायकवाड ही बालिका 11 एप्रिल 2016 पासून सापडली असून आजमितीला तिचे वय 13 वर्ष आहे. करुणा योगेश रंधे ही बालिका 27 जुलै 2012 पासून सापडली असून आजमितीला तिचे वय 17 वर्ष आहे.
सदर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर येत्या तीस दिवसाच्या आत लवकरात लवकर या बालिकांच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन बाल कल्याण समिती जळगाव (0257- 2239851) व जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलींचे बालगृह / निरीक्षण जळगाव (0257- 2224207) तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष जळगाव (0257 – 2228825) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर बालकाचे कुणी पालक अथवा नातेवाईकांनी संपर्क न केल्यास अध्यक्ष/सदस्य बाल कल्याण समिती जळगाव यांच्या आदेशाने बालिकांच्या पढील पुर्नवसनाची प्रक्रिया केली जाणार असल्याचे वनिता सोनगत, सदस्य सचिव, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकाच्या माध्यमातून कळवले आहे.