शिवभोजन केंद्रातील भांडी धुतली जातात शौचालयात

यवतमाळ : ग्रामीण भागातील गोरगरीब जनता कामानिमीत्त तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यानंतर दुपारच्या वेळी क्षुधाशांतीसाठी शिवभोजन थाळीचा सहारा घेतात. कमी पैशात पोटाची खळगी भरण्यासाठी मायबाप राज्य सरकारने सुरु केलेल्या या शिवभोजन थाळीकडे गोरगरीब जनतेचे पाय वळतात.

मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवभोजन केंद्रातील भिषण प्रकार जनतेसमोर आला असून संतापाची लाट पसरली आहे. या शिवभोजन केंद्रातील ग्राहकांच्या थाळ्या शौचालयातील पाण्याने धुतल्या जातात. नंतर त्याच थाळ्या नवीन ग्राहकांना त्यांची क्षुधाशांती करण्यासाठी दिल्या जातात. हा किळसवाणा प्रकार काही जागरुक नागरिकांनी तयार केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून उघड झाला आहे. सत्ताधारी पक्षातील एका महिलेचे हे केंद्र असल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here