जळगाव : सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास तिस हजाराची लाच घेतांना आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गोपाळ कडू चौधरी असे या शिपायाचे नाव आहे. बेरोजगार व्यक्तीला नोकरीची ऑर्डर मिळवून देण्याकामी 2 लाख 10 हजार रुपयांपैकी तिस हजार रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता त्याला महागात पडला.
सुशिक्षीत बेरोजगार असलेल्या तक्रारदाराने जळगाव जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ जळगाव या कार्यालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कंत्राटी सिक्युरिटी गार्डच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. कंत्राटी सिक्युरीटी गार्डची नोकरी लावून ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपाई गोपाळ चौधरी याने तिस हजाराची लाच घेताच दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. डीवायएसपी शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहाभाग घेतला.