पोलिस अधिका-यास धक्काबुक्की करणा-यावर गुन्हा

On: April 12, 2022 10:20 AM

औरंगाबाद : रामनवमीनिमित्त विनापरवानगी मिरवणूक काढून डीजे वाजवणा-या आणि पोलिस अधिका-याला अरेरावीची भाषा करुन धक्काबुक्की करणा-या कुख्यात गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. पवन इश्वरलाल जैस्वाल असे गुन्हा दाखल झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद शहरातील साईराम मंदीर ते मैत्रेय बुद्धविहार दरम्यान रविवारी रात्री रामनवमीनिमीत्त मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी पोलिस उप – निरीक्षक निवृत्ती गायके यांनी मिरवणूक काढू नये आणि डीजे बंद करण्याबाबत सुचना दिल्या. त्यावेळी पवन याने  पोलिसांना अरेरावीची भाषा वापरली. त्याने पोलिस उप निरीक्षक निवृत्ती गायके यांची कॉलर धरत त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment