जळगाव : ‘गोली वडा पाव’ ग्लोबल होऊन देशी स्ट्रीट फूडला जगभरात प्रसिद्ध करण्यासाठी, इज्जत देण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत. ‘वडा पाव’ विकून एखाद्याने कोट्यवधींची उलाढाल केलेल्या गोली वडापाव चे संस्थापक व्यंकटेश अय्यर यांच्या थक्क करणाऱ्या, रोमांचकारी यशोगाथेची अनुभूती जळगावकरांनी घेतली. जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात जितो जळगाव चॅप्टर तर्फे ‘Zero to 350 Crores’ by selling VadaPav! अर्थात”शून्य से तीनसो पचास करोड की यात्रा” जितो टॉक्स अंतर्गत गोली वडापावचे संस्थापक श्री व्यंकटेश अय्यर यांनी उपस्थितांसमोर आपला व्यावसायिक प्रवास उलगडून दाखविला.
सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीद्वारे भगवान श्रीमहावीर २६२१ जन्मोत्सव आयोजित करण्यात आलेला असून त्या अंतर्गत 10 ते 15 एप्रील दरम्यान विविध कार्यक्रम आयोजण्यात आलेले आहेत त्या शृंखलेत हा कार्यक्रम झाला. मुलाने चांगला अभ्यास करावा, इंजिनिअर, डॉक्टर किंवा सनदी अधिकारी व्हावे मध्यमवर्गीय तामिळ कुटुंबांना मुलांकडून ज्या अपेक्षा असतात त्याही अपेक्षा माझ्याकडून माझ्या परिवारास होत्या. पण माझा कल काही वेगळाच होता. मला ज्यात आपले कर्तृत्व दाखवायचे त्या कामात मी स्वतःला झोकून दिले. ‘गोली’ ब्रँड निर्माण केला. फेब्रुवारी 2004 मध्ये मी गोली वडा पावचे पहिले केंद्र ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये सुरू केले. त्यात स्वच्छता, उत्तम सेवा दिली. उल्हासनगर कडून फ्रांचाईजिसाठी मागणी झाली. 15 फ्रांचाईजि दिल्या. त्यात अनेक आव्हाने होते. त्यावर मात केली. व्यंकटेश अय्यर यांनी 2004 मध्ये ‘बॉम्बे बर्गर’ नावाची कंपनी सुरू केली. आज या कंपनीचे देशभरात तब्बल 350 आउटलेट आहेत. कुटुंबाला असे स्वप्नातही वाटले नव्हते की, आपला मुलगा फक्त वडा पाव विकून एवढे मोठे यश मिळवू शकेल.’ व्यंकटेश यांनी स्वत:चा बिझनेस उभारण्यापूर्वी तब्बल 15 वर्षे वित्त क्षेत्रात काम केले. आपल्या अनुभवांबद्दल ते म्हणाले, “बर्याच वर्षांमध्ये माझे लक्ष रिटेल मार्केटला बळकटी देण्यावर होते. गरजू लोकांसाठी आणखी रोजगार निर्माण व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यादृष्टीने दिवस रात्र समर्पण भावनेने त्यांनी काम केले. व्यंकटेश यांनी कंपनीच्या कामाव्यतिरिक्त गरजू मुलांच्या शिक्षणाबाबतही पुढाकार घेत शैक्षणिक कार्यात देखील त्यांचे उत्तम कार्य सुरू आहे. शाळा सोडलेल्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कंपनीत काम करण्याची संधी देणे. जेणे करून त्यांना रोजी-रोटी मिळू शकेल ते बेरोजगार राहू शकणार नाही. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या जीवनाचा व्यंकटेश यांच्यावर मोठा प्रभाव आहे, त्यांनाच त्यांनी आपला व्यावसायिक आदर्श मानला आहे.
आरंभी जितोच्या कार्य-परिचयाचा माहितीपट दाखविण्यात आला. जितो जळगावचे चेअरमन अजय ललवाणी यांनी उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. यावेळी जितो आर.ओ. एम.(रोम) चे व्हाईस चेअरमन सतीश हिरण (नाशिक) यांनी देखील सुसंवाद साधला. व्यंकटेश अय्यर यांचा परिचय करून देण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुलेखा लुंकड यांनी तर आभारप्रदर्शन जितो, जळगावचे सचिव दर्शन टाटिया यांनी केले. स्वाध्याय स्वाध्याय भवन येथे सकाळी 7.00 ते 8.00 दरम्यान सम्यक महिला मंडळाच्या सौजन्याने श्री आनंदजी बंब यांचे “शासन जयवंत हो, संप्रदायिकता का अंत हो” या विषयावर व्याख्यान पार पडले. यात जैन शास्त्रांचा सोप्या भाषेत संकल्पना स्पष्ट करून तत्व समजावून सांगितले. आजच्या परिस्थितीमध्ये भगवान महावीरांचे विचार आजही कसे प्रासंगिक आहेत, ते सोदाहरण स्पष्ट केले. सकाळी 8.00 ते 9 00 दरम्यान सुशील बालिका मंडळातर्फे ‘चिठ्ठी निकालो, अपने भाव रखो’ असा वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रम स्वाधाय भवन येथे पार पडला तर. सकाळी 9.00 ते 10.00 दरम्यान ‘स्वभाव की सुंदरता’ या विषयावर प.पू. संवेगनिधीची म.सा. यांचे प्रवचन देखील झाले.
१३ एप्रिल २०२२ चे कार्यक्रम – सकाळी 7.30 ला खान्देश सेंट्रल मॉल येथे जळगाव जैन युवा पावरतर्फे ‘ट्रेझर हंट 2022’ हा उपक्रम आहे. सकाळी 8.00 वाजता पांजरापोळ गोशाला येथे वासुपुज्य महिला मंडल द्वारा गोमातेला लापसी अर्पण करण्यात येईल. स्वाध्याय भवन येथे सकाळी 9.00 ते 10.00 दरम्यान ‘प्रभू से मित्रता’ या विषयावर प.पू. संवेगनिधीजी म. सा. यांचे व्याख्यान तर संध्याकाळी 6.30 ला बालगंधर्व नाट्यगृह येथे विविध स्पर्धेत विजयी स्पर्धकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. लगेचच 6:45 ला विविध महिला मंडल तर्फ विविध प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. स्वरूप लुंकड़ यांनी केले आहे.