बुलडाणा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणूकाई येथे कक्षसेवकपदी असलेले श्रीराम शेळके (47) यांची समलैंगिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड झाले होते. या हत्येनंतर खळबळ उडाली होती.
या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाअंती पोलिसांनी आनंद कुंदन गवई (रा. सावित्रीबाई फुले नगर), शाश्वत रमेश खंडायता ऊर्फ छोटू रा. बजरंग नगर, आदेश सुनील राठोड रा.क्रीडा संकुल नगर, चेतन गुलाबराव वावरे रा. वावरे ले आऊट, संतोष रमेश शर्मा रा. संभाजीनगर, दीक्षांत ब्रम्हचारी नवघरे जुनागाव, कुंदन राम बेंडवाल रा. रामदेव नगर अशा सात जणांना पोलिसांनी अटक केली. अटकेतील सर्वांना न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले असता 20 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत रवानगीचे आदेश देण्यात आले आहे.