गेवराई : बनावट लग्न लावून देत तरुणाला दोन लाख रुपयांचा गंडा घालणा-या मुख्य सुत्रधाराला गेवराई पोलिसांनी मंगळवारी रात्री शेवगाव येथून अटक केली आहे. रामकिसन जगन्नाथ तापडीया असे अटकेतील मुख्य सुत्रधाराचे नाव आहे.
तळणेवाडी येथील कृष्णा अशोक फरताळे या उपवर तरुणासाठी रामकिसन जगन्नाथ तापडिया (रा. सालवडगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) याने औरंगाबाद येथील तरुणीचे स्थळ आणले होते. दोन लाख रुपये देण्या घेण्याच्या अटीवर नवरी मुलगी रेखा चौधरी व इतर चौघांनी लग्नास सहमती दर्शवली होती. रक्कम हाती पडल्यानंतर लग्न समारंभ पार पडला होता. कृष्णा फरताळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष विश्वनाथ शिंदे, सुनीता बाळू चौधरी, रेखा बाळू चौधरी, रामकिसन जगन्नाथ तापडिया व विठ्ठल किसन पवार अशा पाच जणांविरुद्ध गेवराई पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती.