चमत्कार- साईसमाधी मंदिराच्या तळघरातून वाहतेय पाणी

saibaba

शिर्डी : “सबका मालिक एक” हा मंत्र देणारे शिर्डीचे साईबाबा आणि चमत्कार यांचे जवळचे नाते आहे. लॉकडाऊन काळात सध्या शिर्डीचे साईबाबा देवस्थान बंद आहे. बंद असलेल्या मंदिराच्या समाधीलगतच्या तळघरात काही दिवसांपासून पाण्याचे झिरपणे सुरु आहे. झिरपणा-या या पाण्यामुळे साई संस्थानच्या चिंतेत भर पडली आहे.

या समस्येवर तोडगा म्हणून काही ठिकाणी ड्रिल करुन केमीकलचा भरणा करुन झिरपणा-या पाण्याला अटकाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यात हवे तसे यश आले नाही.  या जागेतून जवळपास पाचशे ते सहाशे लिटर पाणी निघत आहे.

साईबाबांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूच्या दर्शन रांगेखाली असलेल्या तळघरात एक स्टीलचा दरवाजा आहे. या दरवाजावर पाय ठेवल्यानंतर भक्त पुढे सरकत असतात. दर्शनाची रांग बंद झाल्यानंतर उघडलेल्या दरवाज्यातून पाय-या उतरुन खाली तळघरात जाता येते.

देवस्थानाच्या जमीनीखालच्या भागात समाधी समाधी चौथा-याजवळ उत्तर बाजूला दोन तळघर आहेत. या दररोज वापरली जाणारी साईमुर्तीची दागिने व पुजेसाठी लागणा-या मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात. सुमारे शंभर वर्षापुर्वी हा वाडा बांधला होता. या तळघरातील समाधीच्या भिंती व पाय-यांमधून पाण्याचा पाझर सुरु आहे. हा पाण्याचा प्रवाह थांबण्यासाठी संस्थानचे प्रशासन प्रयत्न करत आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here