जळगाव : चौघा तरुणांनी विटा फेकून मारल्याने केलेल्या हल्ल्यात तरुण जबर जखमी झाला आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश रविंद्र पाटील असे या विटांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणचे नाव आहे. किरण चितळे, बंटी उर्फ चोट्या, विजय मराठे, विककी गोसावी असे हल्लेखोर तरुणांची नावे आहेत.
सुप्रिम कॉलनी भागातील रहिवासी राकेश पाटील हा तरुण चहा नाश्त्याची गाडीवर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवतो. 23 एप्रिलच्या दुपारी राकेश पाटील घरी झोपलेला असतांना त्याची पत्नी घराच्या गॅलरीत भांडे घासत होती. त्यावेळी किरण चितळे याने राकेश पाटील याच्या पत्नीजवळ येवून पिण्यास थंड पाण्याची मागणी केली. आमच्याकडे थंड पाणी नाही असे त्याला सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळाने किरण चितळे हा बंटी उर्फ चोट्या, विजय मराठे, विक्की गोसावी अशा सर्वांसह आला. चोघांनी मिळून दाराशी पडलेल्या विटा राकेश पाटील याच्या डोक्यावर फेकून मारल्याने तो जखमी झाला. या चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.