जळगाव : जळगाव शहरातील उप कारागृहाच्या मागे सुरु असलेला तीन पत्ती जुगाराचा डाव सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली उधळून लावण्यात आला. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एकुण 2 लाख 5 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामधे 7 हजार 320 रुपये रोख तसेच रिक्षा, मोटार सायकल, मोबाईल व जुगाराची साधने यांचा समावेश आहे.
राजु तडवी (35) रा. किनगांव ता. यावल, रामकृष्ण साहेबराव सपकाळे (34) रा. कांचन नगर आसोदा रोड, जळगांव, रमेश श्रावण सोनवणे (48) रा. बालाजी मंदीराचे मागे जळगांव, चेतन अनिल भालेराव (23) रा. स्वामी विवेकानंद नगर जळगांव व कुणाल महेश कोळंबे (22) रा. स्वामी विवेकानंद नगर जळगांव अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. मुख्यालय कर्मचारी पो.कॉ. निलेश भगवान राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला महाराष्ट्र पोलीस जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक प्रदीप चांदेलकर, उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोहेकॉ सुहास पाटील, पोना रविंद्र मोतीराया, पोकॉ निलेश पाटील, मुख्यालयातील कर्मचारी निलेश भगवान राठोड, आकाश प्रदीप शिंपी, आकाश कडु माळी, रविंद्र हरी सुरळकर, जीवन लक्ष्मण जाधव, राहुल नाना पाटील, चंद्रकांत समाधान चिकटे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.