जळगाव : तालुक्यातील वराड बुद्रुक (धोबी वराड) ग्राम पंचायत अंतर्गत 16 लाख 64 हजार रुपयांचा गैरकारभार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. धोबी वराड येथील रहिवासी नितीन ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह सुमारे चाळीस जणांनी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या माध्यमातून या प्रकरणी पाठपुरावा सुरु केला आहे.
स्मार्ट ग्राम बक्षीस व ग्रामनिधी रकमेत सदर रकमेचा गैरकारभार झाला असून याप्रकरणी ग्रामपंचायत सचिव बबन वाघ यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन तसा अहवाल जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे सादर करण्यात आला आहे. याशिवाय चौदाव्या वित्त आयोगाचा अहवाल देखील सादर करण्यात आला असून कोणतेही विकास कामे न करता मोजमाप पुस्तिका व अंदाजपत्रक सादर करुन शासनाची दिशाभुल केल्याचा आरोप करण्यत आला आहे. उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यास कळवले आहे.