जळगाव : रोजगार हमी योजनेच्या मानधन धनादेशावर सही करण्यासाठी तडजोडीअंती चार हजार रुपये मागणा-या ग्रामसेवक आणि खासगी इसमाच्या रुपातील महिला सरपंच पतीचे काम एसीबीच्या सापळ्यात आज बिघडले. ग्रामसेवकाच्या सांगण्यावरुन खासगी इसम असलेल्या सरपंच पतीने ती रक्कम स्विकारली. काशिनाथ राजधर सोनवणे (52) असे वरसाडे प्र.पा. ता.पाचोरा जि.जळगाव येथील ग्रामसेवकाचे तर शिवदास भुरा राठोड (67) असे खासगी इसम असलेल्या वरसाडे प्र.पा.ग्रामपंचायत महिला सरपंच पतीचे नाव आहे. सुरुवातीला तक्रारदारास सहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. नंतर तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याघेण्याचे ठरले.
पोलिस उप अधिक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक संजोग के.बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.