अट्टल घरफोड्या मुद्देमालासह अटक

On: May 30, 2022 8:59 PM

जळगाव : जळगाव शहरातील विविध नागरी वसाहतींमधे घरफोड्या करणा-या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर जळगाव शहरातील चोरी घरफोडीचे तेरा गुन्हे उघडकीस आले आहेत. नीरज देविप्रसाद शर्मा रा. फरकाबाद उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या कब्जातून चार मोटार सायकल, सोन्याचे दागिने, तिन टीव्ही सेट, संगणक, लॅपटॉप, इन्व्हर्टर, बॅटरी, भांडे व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अटकेतील नीरज शर्मा याने जळगाव शहरातील जिल्हापेठ, रामानंद नगर आणि तालुका पोलिस स्टेशनला केलेले एकुण तेरा गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याच्या तपासकामी सपोनि जालिंदर पळे, सफौ. युनूस शेख इब्राहिम, सफौ. वसंत ताराचंद लिंगायत, पोहेकॉ गोरखनाथ बागुल, पोना रविंद्र रमेश पाटील, पोना परेश प्रकाश महाजन, पोना किरण धनगर, पोना प्रमोद लाडवंजारी, पोकॉ दिपककुमार फुलचंद शिंदे, चापोहेकॉ राजेंद्र पवार, चापोकॉ प्रमोद ठाकूर आदींनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment