जळगाव : परप्रांतातून महाराष्ट्रात पाणीपुरी विकण्याच्या बहाण्याने येवून मोटार सायकल चोरीचे काम करणा-या अट्टल मोटार सायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. महाराष्ट्रात येवून कामधंदा करण्याच्या आडून गुन्हे करणा-या परप्रांतीय गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली असल्याचे यानिमीत्ताने म्हटले जात आहे. मनिष उर्फ मायाराम जनरलसिंग यादव रा ग्वालियर ह.मु. जळगाव असे अटक करण्यात आलेल्या मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे.
अटकेतील पाणीपुरी विक्रेता मनीष यादव याच्या कब्जातून जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल एकुण तिन आणि जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या एक मोटार सायकल चोरीची कबुली दिली आहे. त्याच्या कब्जातून एकुण चार मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.रवी नरवाडे, स. फौ. युनुस शेख, पोहेकॉ राजेश मेढे, पोहेकाँ संजय हिवरकर, पोहेका संतोष मायकल, पोकाँ ईश्वर पाटील, हेमंत पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील मनीष यादव याने ग्वालीयर येथे देखील गुन्हे केले असल्याचे समजते. पुढील तपासकामी त्याला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.