एक लाख रुपयांची लाच पीएसआयला पडली महाग

जळगाव : सुरुवातीला साडेचार लाख रुपयांच्या मागणीनंतर घासाघीस करुन एक लाख रुपयांची लाच घेतल्यानंतर पोलिस उप निरीक्षकास एसीबीच्या सापळा पथकाने आपल्या ताब्यात घेतले. मेहुणबारे पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले योगेश जगन्नाथ ढिकले असे एसीबी कारवाईच्या सापळ्यात फसलेल्या पीएसआयचे नाव आहे.

या घटनेतील तक्रारदाराविरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशनला 29 मार्च 2022 रोजी गु.र.नं. 71/2022 भादवि कलम 115, 118 व 120 ब नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्या गुन्ह्याच्या कागदपत्रात योग्य ती मदत करुन न्यायालयात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यासह पोलिस स्टेशनला दिलेली हजेरी माफ करण्याच्या मोबदल्यात पीएसआय योगेश ढिकले यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला पंचासमक्ष साडेचार लाख रुपयांची मागणी केली. नंतर घासाघीस अर्थात तडजोड करुन ती रक्कम एक लाख रुपये देण्याघेण्याचे ठरले.

एक लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारताच दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने पीएसआय ढिकले यांना ताब्यात घेत पुढील कारवाई वेगात केली. डीवायएसपी शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here