दोन हजाराच्या लाच सापळ्यात नाशिकला पोलिस ताब्यात

नाशिक : चेक बाउन्स प्रकरणातील पकड वॉरंटमध्ये अटक टाळून जामीनासाठी मदत करण्याचे सांगत तक्रारदाराकडून दोन हजाराची लाच स्विकारणा-या पोलिस कर्मचा-याला एसीबीने ताब्यात घेतले आहे. कारभारी भिला यादव (52) असे रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्याच्या ओझर पोलिस स्टेशनमधील कर्मचा-याचे नाव आहे. काळाराम मंदीर परिसरात एसीबीने लावलेल्या सापळ्यात कारभारी यादव यास अलगद ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध कारवाई सुरु आहे.

उसनवार घेतलेल्या रकमेच्या बदल्यात दिलेला चेक बाऊन्स झाल्यामुळे संबंधीत व्यक्तीने तक्रारदाराविरुद्ध खटला दाखल केला आहे. या खटल्यात तक्रारदाराच्या विरुद्ध न्यायालयाकडून पकड वॉरंट काढण्यात आले आहे. ओझर येथील रहिवासी तक्रारदारास ओझर पोलिस स्टेशन कर्मचारी कारभारी यादव याने फोन करुन बोलावले होते. जामीनदाराचे कागदपत्रांसह सहकार्य करण्यासाठी दोन हजार रुपये देखील सोबत आणण्यास कारभारी यादव यांनी सांगीतले होते. त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने लाच स्विकारतांना त्यास ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here