जळगाव : न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर आरोपीला अमळनेर येथून जळगावला आणले जात असतांना तो पोलिसांना हिसका देत पळून जाण्यात यशस्वी झाला होत. मात्र बारा तासातच धुळे पोलिसांच्या मदतीने अमळनेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजेश निकुंभ असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमळनेर बस स्थानक परिसरातून तो पसार झाला होता. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील सहायक फौजदार बापू साळुंखे, हे. कॉ. सुनील हटकर, पोलिस नाईक दीपक माळी, रवींद्र पाटील, पो.कॉ. निलेश मोरे, गणेश पाटील, चालक सुनील पाटील असे सर्वजण फरार राजेश निकुंभ याचा शोध घेत होते. त्याचा नवलनगर येथील साथीदार तुषार प्रदीप कदम याला ताब्यात घेत माहिती घेतली असता तो धुळे जिल्ह्यातील फागणे येथे असून सुरतला पळून जाण्याच्या बेतात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांच्या मदतीने त्याला फागणे येथून अटक करण्यात आली. धुळे तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व उपनिरीक्षक सागर काळे, कर्मचारी सुनील विंचूरकर, प्रवीण पाटील, नितीन दिवसे, धीरज सांगळे, कुणाल शिंगाणे, कांतिलाल शिरसाठ, राकेश मोरे आदींचे या कामी सहकार्य अमळनेर पोलिस पथकाला लाभले.