जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील रहिवासी चेतन गोविंदा पाटील या तरुणास दोन गावठी कट्टयासह अटक केली आहे. चेतन गोविंदा पाटील हा तरुण गावठी कट्टे बाळगत असून परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना त्याचा शोध घेण्यास कामी रवाना केले होते.
त्याच्या कब्जातून 50 हजार रुपये किमतीचे गावठी कट्टे करण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कामी त्याला एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, पोहेकाँ अश्रफ शेख, सुनिल दामोदरे, दिपक पाटील, पोलीस नाईक नंदलाल पाटील, पोना भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, राहूल बैसाणे, अशोक पाटील, पोकॉ ईश्वर पाटील आदींनी या तपासाकामी सहभाग घेतला.