काडीला च्युईंगम लावून दानपेटीच्या रकमेवर हल्ला; सर्व रक्कम हडपण्यासाठी गल्ल्यावरच मारला डल्ला

अमरावती : चोरी करण्यासाठी चोर विविध युक्त्या करत असतात. चोरांनी केलेली अशीच एक युक्ती अमरावती येथे काही दिवसांपुर्वी उघडकीस आली. जास्त रकमेच्या मोहात पडल्यामुळे चोरटे पकडले गेले आणि पोलिसांच्या ताब्यात आले. सुशिल देवानंद चिंचखेडे (20) आणि आश्विन ऊर्फ आशु विजय रामटेके (20), दोघेही रा. उत्तमनगर, अमरावती अशी अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे आहेत.

अमरावती शहरात असलेल्या भीम टेकडीवर एक विहार आहे. या विहारात दोन दानपेट्या होत्या. या दानपेट्यांमधील रक्कम सुशिल आणि अश्विन हे दोघे चोरटे शिताफीने गायब करत होते. दानपेटीच्या उंचीएवढी बारिक काडी अथवा पट्टी ते रोज घेऊन येत होते. त्या काडी अथवा पट्टीच्या टोकाला ते च्युईंगम लावत होते. च्युईंगम लावलेली बारिक काडी अथवा पट्टी दानपेटीत टाकल्यानंतर त्या पट्टी अथवा काडीला नोटा चिटकून येत असत. मात्र नंतर दोघांचा मोह वाढला. दोघांनी मिळून ती दानपेटीच फोडली. तपासात फ्रेझरपुरा पोलिसांच्या जाळ्यात दोघे पकडले गेले. दानपेटीतील पन्नास हजारापैकी तिस हजाराची रक्कम दोघांकडून हस्तगत करण्यात आली. फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल कुरळकर यांच्या पथकाने दोघा चोरट्यांना गजाआड केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here