जळगाव : स्थानीक गुन्हे शाखेसह नशिराबाद पोलिस स्टेशन पथकाच्या मदतीने आज टाकलेल्या छाप्यात एक कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईने खळबळ माजली आहे. भुसावळ तालुक्यातील तिघ्रे या गावात गांजा या अंमली पदार्थाची चोरटी विक्री करत असल्याची गोपनीय माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह नशिराबाद पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तिघ्रे या गावी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. या छापा कारवाईत मनोज रोहीदास जाधव याच्या राहत्या घरात सुमारे 885 किलो वजनाचा अंदाजे 1 कोटी 6 लाख 20 हजार रुपये किमतीचा गांजा मिळून आला. सदर गांजा जप्त करण्यात आला असून राहुल काशिनाथ सुर्यवंशी, रा. वाडीशेवाडा ता. पाचोरा यास ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले, सपोनि जालींदर पळे, पोउनि अमोल देवढे, सहायक फौजदार युनुस शेख ईब्राहीम, वसंत ताराचंद लिंगायत, रवी पंढरीनाथ नरवाडे, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ कमलाकर भालचंद्र बागुल, पोहेकॉ अनिल गणपतराव देशमुख, पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोहेकॉ अक्रम शेख याकुब, पोहेकॉ संदीप श्रावण साबळे, पोना नंदलाल दशरथ पाटील, पोना विजय शामराव पाटील, पोना भगवान तुकाराम पाटील, पोना नितीन प्रकाश बाविस्कर, पोना प्रमोद अरुण लाडवंजारी, पोकॉ ईश्वर पंडीत पाटील, पोकॉ लोकेश भास्कर माळी, रमेश भरत जाधव, विजय गिरधर चौधरी, दर्शन हरी ढाकणे तसेच नशिराबाद पो स्टेचे प्रभारी अधीकारी सपोनि अनिल मोरे, पोउनि राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ गजानन देशमुख, पोना किरण बाविस्कर, पोना रविद्रं इंघाटे, पोना सुधिर विसपुते, पोना समाधान पाटील, पोकॉ विजय अहीरे, दिनेश भोई आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.