पशुधनाची निर्दयी वाहतुक करणा-या दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : वाहनांमधे सात गायींना निर्दयीपणे एकावर एक कोंबून त्यांची विनापास विनापरवानगी वाहतुक करणा-या दोघांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांच्या ताब्यातील बोलेरो वाहन व सात गायी असा 3 लाख 92 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

8 जुलै रोजी कन्नड घाट रिपीटर चौक येथे चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, हे.कॉ. विकास चव्हाण, पो.ना. संदिप पाटील, पो.कॉ. राकेश काळे, प्रशांत पाटील असे सर्वजण नाकाबंदी करत होते. सदर नाकाबंदी दरम्यान चाळीसगाव ते कन्नड दरम्यान जुबेरखान हमीद खान (23) रा. सदानंद हॉटेल जवळ घाटरोड चाळीसगांव व अतिक खान खलील खान (22) रा छोटी गुजरी चौधरी पाडा चाळीसगांव असे दोघे जण बोलेरो पिक अप (एमएच 04 एफडी 9566) या वाहनातून अवैधरित्या निर्दयीपणे एकावर एक कोंबुन सात गायींची वाहतुक करतांना आढळून आले. त्यांना त्यांच्या ताब्यातील वाहन व गायींसह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 (डी) (ई) व मोटार वाहन कायदा कलम 3.130,184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धरमसिंग सुंदरडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here