एअर इंडिया च्या विमानाचा भीषण अपघात

एअर इंडिया च्या विमानाचा भीषण अपघात

तिरुअनंतपूरम : केरळच्या कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानााचा अपघात झाला आहे.  दुबई येथून केरळ येथील करीपूर विमानतळावर लँडिंग होत असलेले विमान धावपट्टीवर घसरले. त्यावेळी विमानात 191 प्रवासी होते.

दुबई-कोझिकोड बोईंग 737 हे विमान सायंकाळी 7:41 वाजता करीपूर विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी धावपट्टीवरील विमान लँडिंगच्या वेळी घसरले. हे विमान दुबईहून प्रवासी घेऊन निघाले होते. हे विमान नेमके कसे घसरलं याचे  कारण अजून स्पष्ट होवू शकले नाही. तसेच या घटनेत किती जिवीतहाणी झाली हे देखील स्पष्ट होवू शकले नाही.

विमानाच्या पुढच्या भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन वैमानिकांसह सहा क्रू मेंबर्स यावेळी विमानात हजर होते. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अपघातानंतर विमानाच्या पुढच्या भागाचे अक्षरश: दोन तुकडे झाले आहेत. डीजीसीएम कडून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here