जळगाव : बनावट आदेशाने प्लॉट विक्री केल्याप्रकरणी भुसावळ येथील संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांच्यासह लिपीक श्याम तिवारी या दोघांना अटक केली आहे. भुसावळ शहर पोलिसांनी केलेल्य अटकेच्या या कारवाईमुळे महसुल प्रशासनात खळबळ माजली आहे.
भुसावळ येथील जनकल्याण अर्बन पतसंस्थेचे प्लॉट विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे याने तहसीलदारांच्या बनावट आदेशाने एकुण दहा जणांना प्लॉट विक्री केल्याचे उघड झाले आहे. धांडे याच्यासह दहा खरेदीदार अशा एकुण अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य संशयित धांडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तहसीलदार दीपक धिवरे यांच्या रजा कालावधीत हा गैरप्रकार झाला आहे.