औरंगाबाद : बीड जिल्ह्याच्या माजलगाव शहरातील जुन्या डीवायएसपी कार्यालयातून जुन्या रेकॉर्डची नासधून करत विस हजार रुपये किमतीची तिजोरी चौरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान औरंगाबाद येथील पगारिया ऑटो शो रुम मधील 15 लाख 43 हजार 247 रुपयांनी भरलेल्या तिजो-या चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत. औरंगाबादच्या घटनेत लाखो रुपयांनी भरलेल्या तिजो-यांची तर माजलगाव येथील घटनेत रिकाम्या तिजोरीची चोरी झाली आहे. रोख रकमेने भरलेल्या तिजो-या चोरुन नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर छावणी उड्डाणपुलाखाली काही रिकाम्या तिजो-या आढळून आल्या आहेत. हर्सुल परिसरात देखील एक रिकामी तिजोरी आढळून आली. दगडांनी तिजोरी फोडून त्यातील रोख रक्कम काढून घेत चोरट्यांनी आपली करामत दाखवल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे.
औरंगाबाद येथील जालना रस्त्यावर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विरुद्ध दिशेला पगारिया ऑटोचे कार व दुचाकीचे शो रुम आहे. 3 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजता नेहमीप्रमाणे शो रुम बंद करण्यात आले. 4 ऑगस्टच्या सकाळी या शो रुमचे शटर उचकटलेले दिसून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपनिरीक्षक विकास खटके पुढील तपास करत आहेत.