जळगाव दि.13 प्रतिनिधी– स्वातंत्र्याचा इतिहास हा बलिदान आणि शौर्याचा आहे. स्वातंत्र्यविरांच्या पराक्रमाच्या या गाथेचे स्मरण करीत समतेसोबतच विश्वशांतीचा संदेश देणारी विशेष सजावट चौकांमध्ये करण्यात आली आहे. तिरंग्यातील शौर्य, शांती, त्यागाच्या तिनही रंगाच्या विद्युत रोषणाईने जळगाव शहर उजाळुन निघाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे आकर्षक रंगसंगती असणारी विद्युत रोषणाई केली आहे. यात शहरातील राष्ट्रीय महापुरूषांच्या १९ पुतळ्यांसह, लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक यासह महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान यांचा समावेश आहे. यातुन शहरवासियांच्या मनात राष्ट्राभिमानाचा जागर होत आहे.
जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलालॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे शहरातील चौकांवर विशेष सजावटींसह प्रबोधनात्मक संदेश दिले आहे. यातून राष्ट्रीय एकात्मेची जाणिव निर्माण होत आहे. काव्यरत्नावली चौकात विशेष सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोबतच लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक याठिकाणीही विद्युत रोषणाईतुन राष्ट्रभक्तीचा जागर केला आहे.
महापुरूषांच्या पुतळ्यांवर रोषणाई : शहरातील १९ सार्वजनिक स्थळी असलेल्या राष्ट्रीय महापुरूषांच्या पुतळ्यांवर रोषणाई केली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाराणा प्रताप पुतळा, महात्मा गांधी पुतळा, पंडीत जवाहरलाल नेहरू पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लाल बहादूर शास्त्री पुतळा, नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा, स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर पुतळा, शाहिर अण्णाभाऊ साठे पुतळा, सानेगुरूजी पुतळा, स्व. जेठमल स्वारस्वत स्तंभ, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, संत गाडगे बाबा पुतळा, धनाजी नाना पुतळा, महर्षी वाल्मीक पुतळा, कवयित्री बहिणाबाई पुतळा, संत जगनाडे महाराज पुतळा, नवल स्वामी महाराज पुतळा या पुतळ्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्युत रोषणाई केली आहे.