वेश्या व्यवसाय चालणा-या दोन हॉटेलवर जळगाव शहरात छापे

On: August 18, 2022 10:54 PM

जळगाव : जळगाव शहरात वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या दोन हॉटेलवर सहायक पोलिस अधिक्षक डॉ. कुमार चिंता यांच्या पथकाने आज छापा टाकला. त्यापैकी एका हॉटेलमालकासह एकुण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दुस-या हॉटेल वरील छाप्याप्रकरणी रात्री नऊ वाजेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

सागर भाऊचा ढाबा अ‍ॅन्ड लॉजींग असे एमआयडीसी परिसरातील जी सेक्टर मधील कारवाई करण्यात आलेल्या हॉटेलचे नाव आहे. या हॉटेलच्या मालकासह एकुण चौघांविरुद्ध आज एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉज मालक सागर नारायण सोनवणे रा. जळगाव व सागर सुधाकर पाटील तसेच एक महिला व श्याम नावाचा इसम अशा चौघंविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 चे कलम 5 व 7 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. बोरोले नामक हॉटेल मालकाच्या हॉटेलवर देखील छापा टाकण्यात आला असून या छाप्याविरुद्ध कारवाईचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment