एकाच कुटुंबातील अकरा शव सापडले मृत पाकिस्तानी शरणार्थी


जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर शहरात अकरा शरणार्थींचे मृत्यू झाले आहेत. या मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. विषारी गॅस अथवा रासायनिक द्रव प्राशन केल्याने हे मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. देचू ठाणे हद्दीत असलेल्या लोडता येथील ही घटना आहे. मृत झालेले सर्व अकरा जण पाकिस्तानातून  विस्थापित होवून आलेले होते. ते अचलावता या गावत शेतीची कामे करत होते. या प्रकरणी पोलिस तपास सुरु आहे. 

एकाच कुटूंबातील एकाच परिसरात अकरा शव सापडल्याने परिसरात तर्क वितर्क लावले जात आहेत. या घटनेत सहा प्रौढ तर पाच मुले आहेत. त्यातील सात महिला व चार पुरुष असा समावेश आहे. पाकिस्तानमधील शरणार्थी राजस्थानच्या सिमेलगतच्या गावात आश्रयाला येत असतात. कित्येक गावात केवळ पाकिस्तानी शरणार्थीच रहात असतात. 

मृत परिवारातील एक महिला नर्स होती ती आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आली होती. या नर्स महिलेने अगोदर स्वत:ला व नंतर इतरांना विषारी इंजेक्शन दिले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या परिवारात अकरा सदस्य होते. त्यात राखी बांधण्यासाठी आलेल्या बहिणीमुळे एकुण सदस्य बारा झाले होते. त्यातील एक सदस्य घटनेच्या रात्री शेतात गेला होता. त्याला शेतातच झोप लागल्याने तो बचावला.

घरी परत आल्यावर त्याला हा प्रकार बघण्यास मिळाला.  हा नेमका प्रकार खूनाचा की आत्महत्येचा आहे याचा तपास सुरु आहे. एकंदरीत सर्वच प्रकार संशयास्पद वाटत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here