जळगावच्या डॉ. कोगटांसह तिघांना वन विभागाने केली अटक

जळगाव : शहरातील सुभाष चौक परिसरात रामनाथ मुलचंद कोगटा या दुकानात वन विभागाने सोमवारी रात्री टाकलेल्या छाप्यात घुबडाची नखे, समुद्रघोड्यासह आठ प्रकारच्या वन प्राण्यांची विक्रीसाठी ठेवलेली सुमारे 347 प्रकारचे अवशेष जप्त करण्यात आले आहे. या घटनेत वन विभागाने डॉ. अजय लक्ष्मीनारायण कोगटा (जळगाव), चुनीलाल नंदलाल पवार (खेडगाव तांडा ता. एरंडोल) आणि लक्ष्मीकांत रामपाल मनीयार (जळगाव) अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.

शिकार केलेल्या वन्यप्राण्यांचे अवशेष तस्करीसह विक्री केली जात असल्याची माहिती मिळल्याने वन विभागाने टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघड झाला आहे. या छाप्यात हताजोडी 11 नग, राजमांजर रंगनी 11, सियारसिंगी 260, कासवपाठ एक, इंद्रजाल 38, नाग मणके 21, घुबडींची नखे 3, समुद्रघोडा 2 या वन्यप्राण्यांचे अवशेष मिळाले आहे. सहायक वनसंरक्षक सुदर्शन शिसव, वनपरिक्षेत्र अधिकारी, अमोल पंडित, दत्तात्रय लोंढे, वनपाल संदीप पाटील यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. तिघांना तिन दिवस वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here