आजचे राशी भविष्य (21/09/2022)
मेष : द्विधा मनस्थिती ठेवू नका. संपूर्ण खात्री झाल्याशिवाय कुठलीही संमती देऊ नका.
वृषभ : कामाचा बोजा वाढला तरी कंटाळा करु नका. विद्यार्थ्यांना चमकण्याची संधी. मान सन्मान मिळेल.
मिथुन : व्यवहार आणि नाते यांची गफलत होणार नाही याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा.
कर्क : आजचा दिवस अनुकूल असेल. अचानक धनप्राप्तीचे योग जुळू शकतात. मानसिक शांतता लाभेल.
सिंह : प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. नवीन कामात जपून पावले टाका. राजकीय क्षेत्रात अनुकूल दिवस.
कन्या : हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. संयम आणि धैर्य उपयुक्त ठरेल. अचानक धनलाभ होवू शकतो.
तुळ : आपली मधुर वाणी आपणास मान सन्मान मिळवून देईन. मिळकतीचे नविन स्त्रोत उपलब्ध होतील.
वृश्चिक : सुख साधनात वृद्धी होईल. आर्थिक स्थिती उत्तम होवून मान, सन्मान, यश, किर्ती वाढेल.
धनु : आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल. मतभेद टाळा.
मकर : धावपळ दगदग होण्याची शक्यता. दिवसाचा उत्तरार्ध हास्य-विनोदात व्यतीत होईल.
कुंभ : व्यापारी वर्गाला चांगला दिवस. प्रवास सत्कारणी लागेल. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल.
मीन : कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. पालकांचे शुभाशिर्वाद मोलाचे ठरतील.