आजचे राशी भविष्य (29/09/2022)

आजचे राशी भविष्य (29/09/2022)

मेष : स्मरणशक्तीचा फायदा जाणवेल. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल. धनलाभाचे योग जुळून येण्याची शक्यता.

वृषभ : आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. प्रलोभनाला बळी पडू नका.

मिथुन : महत्त्वाच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी चांगला दिवस. आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष करु नका.

कर्क : हाती घेतलेले काम जिद्दीने पूर्ण करा. भाग्याची भक्कम साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील.

सिंह : सल्ल्यासाठी लोक येतील, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. आध्यात्मिक आवड निर्माण होईल.

कन्या : मित्रांकडून योग्य ते सहकार्य लाभेल. रचनात्मक व विधायक कार्य करण्याकडे कल राहील.

तुळ : दिवसभर व्यस्त रहाल. व्यापाऱ्यांना भागीदार फायदा होण्याची शक्यता. नवीन ओळखी लाभदायक ठरु शकते.

वृश्चिक : आजचा दिवस मध्यम फलदायी ठरेल. अति आत्मविश्वास चुकीचा ठरु शकतो, सावधगिरी बाळगा.

धनु : भविष्यातील योजनांवर आधारीत कार्य कराल. गुंतवणूकीसाठी चांगला काळ आहे.

मकर : माहीत नसलेली जबाबदारी स्वतःहून घेवू नका. परदेशी राहणाऱ्या व्यक्तींकडून शुभवार्ता कानी पडू शकते.

कुंभ : मानसिक शांतता कशी लाभेल याचा विचार करा. वाद विवाद टाळावे. संमिश्र घटनांचा दिवस.

मीन : अपेक्षापुर्ती झाली नाही तरी मन खिन्न करु नका. नविन खरेदी करु नका. जोडीदाराचा सल्ला घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here