कृषी अभ्यास शिबीराचे स्टीकर लावून आले पथक– आयकर विभागाने राबवला धाडीचा फंडाच अथक

On: August 26, 2022 10:54 AM

उस्मानाबाद : विवाह सोहळ्याचे कारवर स्टीकर लावून जालना शहरात आयकर विभागाने विविध धाडी टाकल्याचे प्रकरण ताजे असतांना आता आयकर विभागाने नवी शक्कल लढवल्याचे उघड झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे “कृषी अभ्यास शिबीर” असे कारवर स्टीकर लावून साखर कारखान्यात प्रवेश केलेल्या पथकाने तपासणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रत्येक वेळी नामी शक्कल लढवत असलेल्या आयकर विभागाचे फंडे या निमित्ताने समोर येत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यात प्रवेश करत गुरुवारी आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली. सकाळपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरु होती.

पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अभिजित पाटील हे अध्यक्ष असून त्यांच्याकडे पाच कारखाने आहेत. गुरुवारी भल्या पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास दोन गाड्यांतून बारा अधिकारी व कर्मचारी वर्गाचा ताफा कारखान्यात प्रकट झाला. सर्वप्रथम कारखान्यातील सर्व कर्मचा-यांचे फोन त्यांनी बंद करुन आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर इनवर्ड व आऊटवर्ड रजिस्टरची पाहणी व त्यानंतर अकाऊंट विभागाची तपासणी करण्यात आली. सदर पथक तिन दिवस या कारखान्याची तपासणी करणार असल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment