अठराशे किलो तुप विकले केवळ दिड लाखात— दुध संघ कर्मचा-यांविरुद्ध गुन्हा शहर पोलिसात

जळगाव : सुमारे विस लाख रुपये किमतीपेक्षा अधिक किमतीचे तुप अवघ्या दिड लाख रुपयात विकल्याप्रकरणी जळगाव दुध उत्पादक संघाच्या कर्मचा-यांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघातील फसवणूकीचा प्रकार यानिमीत्ताने उघड झाला आहे. यापुर्वी देखील असे प्रकार होत असावेत काय? अशी शंका यानिमीत्ताने जनतेच्या मनात व्यक्त होत आहे.

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादीत यांच्या मालकीचे 1800 किलो तुप 85 रुपये दराने प्रशासक समितीची परवानगी न घेता विठ्ठल रुख्मिनी या एजन्सीला मात्र 1 लाख 53 हजार रुपये किमतीत विक्री केल्याच्या आरोपाखाली निखील सुरेश नेहेते रा. दादावाडी खोटेनगर जळगाव आणि इतर कर्मचा-यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दुध उत्पादक संघाचे विस लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे नुकसान झाल्याचे म्हटले गेले आहे.

शैलेश सुरेश मोरखडे रा. स्टाफ क्वार्टर विकास डेअरी दूध फेडरेशन जळगाव यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशनला याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांचे मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. संदीप परदेशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here