जळगाव : मलकापूर नगरपरिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या प्रभा माधव फाळके या जेष्ठ नागरिक महिलेची हत्या करणा-या दोघा पिता पुत्रांना न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. मयत महिला प्रभा फाळके यांच्या फोनवर आलेला लास्ट कॉल मुक्ताईनगर पोलिसांना मारेक-यांपर्यंत घेवून गेला. या लास्ट कॉलने मुक्ताईनगर पोलिसांच्या तपासाचे काम ब-याच प्रमाणात सोपे केले.
मयत प्रभा फाळके या महिलेचे मारेकरी भार्गव विश्वास गाढे आणि विश्वास भास्कर गाढे या पिता पुत्रांना मलकापूर पोलिस स्टेशनचे पो.नि. शंकर शेळके व त्यांच्या सहका-यांनी मलकापूर येथून ताब्यात घेतले. या पिता पुत्रांनी केवळ दागिन्यांसाठीच फाळके यांची हत्या केली की अजून काही कारण आहे याचा तपास आरोपींच्या पोलिस कोठडीदरम्यान लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मलकापूर येथील रहिवासी असलेल्या प्रभा फाळके यांचा मृतदेह 29 ऑगस्ट 2022 रोजी मुक्ताईनगर पोलिस स्टेशन हद्दीत आढळून आला होता. प्रभा फाळके यांचे संशयीत पिता पुत्रांच्या घरी नेहमी येणे जाणे होते अशी चर्चा आहे. त्यातून गाढे परिवारात वाद होत असल्याचे म्हटले जात आहे. खूनाचे मुळ कारण अजून स्पष्ट होणार असल्याचे म्हटले जात आहे.