तरुणीवरील अत्याचार प्रकरणी शनीपेठ पोलिसात गुन्हा

On: September 6, 2022 7:38 PM

जळगाव : मानेवर चाकू लावून तरुणीला जखमी तसेच तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 सप्टेबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी विनोद सुकलाल भोळे या तरुणाविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीत राहणा-या तरुणीला विनोद भोळे याने ती रहात असलेल्या घरात येवून तिच्या मानेला चाकू लावून घराबाहेर ओढत नेले होते. त्यानंतर तिने प्रतिकार केल्यानंतर तिला पुन्हा घरात आणले. या घटनेत तिच्या बोटाला चाकूचा घाव लागल्याने ती जखमी झाली होती. दरम्यान त्याने तिच्यावर अत्याचार देखील केल्याचा पिडीत तरुणीचा आरोप आहे. याप्रकरणी पिडीतेने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. रमेश चव्हाण करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment