जळगाव – एक भवावतीरी आचार्य श्री जयमलजी म.सा. यांच्या 315 व्या तीन दिवसीय जयंतीच्या पहिल्या दिवशी स्वाध्याय भवन येथे सकाळी सहा वाजता आचार्य श्री पार्श्वचंद्र जी म.सा. यांच्या महा मांगलीकने ‘पूज्य जयमलजाप’ आरंभ झाला. यावेळी दिवसभर चालणाऱ्या मंगलकारी जपसाठी शेकडो श्रावक-श्राविका सहभागी झाले होते. यावेळी जय जाप समितीचे चेअरमन श्रीमान शांतिलालजी चोपडा चेन्नई, पप्पुभाई अर्थात सुशीलजी बाफना, स्वरुप लुंकड, ममता कांकरिया, अनिल कोठारी, अजय राखेचा यांच्यासह असंख्य भावीक उपस्थित होते.
दिवसभर चालणाऱ्या जपात सुशील बालिका मंडल, समता महिला मंडल, अरिहंत मार्गी महिला मंडल, जय आनंद गृप, स्वाध्याय महिला मंडल, लुक अॅण्ड लर्न, जेपीपी महिला फाउंडेशन, सुशील बहू मंडल, सम्यक महिला मंडल, जितो लेडीज विंग या संस्थेच्या सदस्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. जाप सुरू असताना सेवादास दलुभाऊ जैन यांनी सदिच्छा भेट देऊन जाप करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
छत्रपती संभाजी राजे सभागृहात जळगावच्या महिला मंडळाचा संस्कृतिक कार्यक्रम – सायंकाळी 7 ला सायंकाळी जिल्हाधिकारी मा. अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजी राजे सभागृहात जळगावच्या महिला मंडळाचा संस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. यावेळी विशेष कार्य करणाऱ्या, गुणवंत सदस्यांचा गौरव जिल्हाधिकारी मा. राऊत यांच्याहस्ते करण्यात आला.
जैन हिल्स येथे दोन दिवसांचा कार्यक्रम – महाराष्ट्रातील धर्मनगरी जळगाव येथे जयगच्छाधिपती व्याख्यान वाचस्पती, वचन सिद्ध साधक उग्र विहारी, बारावे पट्टधर वर्तमान आचार्य प्रवर 1008 प.पू. श्री पार्श्वचंद्र जी म.सा, एस.एस. जैन समणी मार्गचे प्ररंभ कर्ता अनुप्पेहा ध्यान प्रणेता प्रवचन प्रभावक ड़. श्री पदमचंद्रजी म.सा, विद्याभिलाषि जयेंद्र मुनीजी म.सा, सेवाभावी जयशेखर मुनिजी म.सा., मौन साधक श्री जयधुरंधर मुनिजी म.सा. विद्याभिलाषी श्री जयकलश मुनीजी म.सा., तत्वरसिक श्री जयपुरंदर मुनीजी म.सा, आदीठाणा 7 यांचा तसेच समणी प्रमुखा श्री श्रीनिधीजी आदी ठाणा 6 हे विराजमान आहेत व त्यांचा चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. योगायोग असा की एक भवावतारी आचार्य सम्राट श्री जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सव जळगाव येथे साजरा होत आहे.
बुधवार दि. 7 रोजी दुपारी अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघाची कार्यकारी सभा, तसेच जे.पी.पी. जैन महिला फाउंडेशनचे राष्ट्रीय अधिवेशन जैन हिल्स येथे होणार आहे. सायंकाळी 7 ला सायंकाळी वाजता छत्रपती संभाजी राजे सभागृह महाबळ रोड जळगाव येथे ऑलइंडिया जे.पी.पी. जैन महिला फाउंडेशनद्वारा सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुती होईल.
गुरुवार 8 सप्टेंबर रोजी जैन हिल्स येथे डॉ. पदमचंद्र जी म.सा यांचे सकाळी 9 ते 10 ओजस्वी प्रवचन, मंगलाचरण, स्वागत गीत, अतिथी स्वागत, प्रस्तावना व गुरुभक्ती होईल. सकाळी 10 ते 11 दरम्यान बहुमान, प्रासंगीक कार्यक्रम, सामूहिक तेले तप प्रत्याख्यान होईल व दुपारी पावणे बारा वाजेपासून आकाश ग्राउंड, जैन हिल्स येथे गौतम प्रसादी होईल. त्यापूर्वी जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यप्रवर प.पु. श्री पार्श्वचंद्र जी म.सा द्वारा महाप्रभावी महा मांगलीक दिली जाणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संघपति दलीचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या सह श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव पदाधिकाऱ्यांनी केले आहे.