मुंबईत 1000 कोटींचे ड्रग्ज जप्त; अफगणीस्तान व इराणहून समुद्रामार्गे प्रवास

जप्त करण्यात अलेले ड्रग्ज

नवी मुंबई : नवी मुंबईतील नाव्हा शेव्हा पोर्टवर महसूल गुप्तचर संचालनालय व कस्टम विभागाने ड्रग्ज जप्तीची मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 1000 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. प्लास्टिक पाइपातून या हेरॉइन्स (ड्रग्ज) ची तस्करी केली जात होती.

हे ड्रग्ज अफगानिस्तान आणि इराण येथून समुद्रातून मुंबईत आणले होते. आतापर्यंतची ही मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. ड्रग्ज माफियांनी कंटरेनमध्ये प्लास्टिक पाईपात हे हेरॉइन्स (ड्र्ग्ज) लपवून ठेवले होते. बांबूच्या काठ्या असल्याचा भास होईल असा रंग त्या प्लास्टीक पाईपांना देण्यात आला होता. आयुर्वेदीक औषधी असल्याचा बनाव ड्रग्स माफियांनी यावेळी केला होता.

दोन कस्टम एजंट या प्रकरणी अटकेत आहेत. तसेच इम्पोर्ट आणि फायन्सस पुरवणाऱ्या एका व्यक्तीला देखील दिल्लीतून अटक केली आहे. दोघांना देखील मुंबईत आणले जाणार आहे. नेरुळ येथील एमबी शिपिंग आणि लॉजिस्टिक सोल्युशनचा कस्टम एजंट मिनानाथ बोडके तसेच मुंब्य्रातून कोंडीभाऊ गुंजाळ या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

प्लास्टीक पाईपातून काढण्यात आलेले ड्रग्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here