जळगाव : शेतक-याच्या मोबाईलची जबरी चोरी करुन तो विक्री करण्याच्या प्रयत्नात फिरणा-या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यावल तालुक्यातील भालोद येथून अटक केली आहे. रोहित मधुकर लोखंडे रा. भालोद ता. यावल असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अट्रावल येथील शेतक-याच्या मोबाईल चोरीप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत सहायक फौजदार युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोना नंदलाल दशरथ पाटील, मोना किरण धनगर, पोना प्रमोद लाडवंजारी, पोना भगवान तुकाराम पाटील, चापोहेकॉ भारत पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.