जळगाव : झाडाला लागलेल्या दोन टन मोसंबी चोरुन चारचाकी वाहनाने पळवून नेणा-या चौघांना भडगाव पोलिसांनी अटक केली आहे. भावेश विजय महाजन रा. भागवत कॉलनी भ्डगाव, तुषार परदेशी रा. वाडे ता. भडगाव, भुषण गोविंदा परदेशी रा. बांबरुड प्र.ब.ता. भडगाव, योगीराज उर्फ भैय्या परदेशी रा. लोहटार व त्याच्यासोबत एक इसम अशा सर्वांनी मिळून विजय लालचंद परदेशी यांच्या शेतातील मोसंबी चोरुन नेण्याचा प्रकार केल्याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील भावेश विजय महाजन यास सुरुवातीला अटक करण्यात आली. इतरांनी छोटा हत्ती वाहनाने चोरीच्या मोसंबी गोण्यांमधे भरुन पळून गेले होते. मात्र इतरांना देखील अटक करण्यात आली आहे. 27 सप्टेबरच्या पहाटे तिन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार छबुलाल नागरे करत आहेत.