चार लाखाची रोकड चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा

On: September 30, 2022 8:39 AM

जळगाव : जळगाव शहरातील अशोक टॉकीज गल्लीतून दुकानदाराची चार लाख रुपयांची रोकड स्कुटीवर आलेल्या दोघांनी चोरुन नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष हुकुमतमल राजपाल रा. सिंधी कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ जळगाव असे रोकड चोरी झालेल्या दुकानदाराचे नाव आहे.

संतोष राजपाल यांच्या भावाचे अशोक टॉकीज गल्लीत अंबे मॉं इलेक्ट्रीक सामानाचे दुकान आहे. या दुकानासमोर संतोष राजपाल यांनी चार लाख रुपयांची पिशवी मोटार सायकलवर ठेवली होती. दरम्यान स्कुटीवर आलेल्या दोघा अनोळखी तरुणांनी ती पिशवी चोरुन नेत पलायन केले. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास उमेश भांडारकर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment